Home » Uncategorized » बुलढाणा » *सहकार विद्या मंदिर, जानेफळचा 100% निकाल*.

*सहकार विद्या मंदिर, जानेफळचा 100% निकाल*.

Share:

*जानेफळ केंद्रामध्ये 100% निकाल*

*देणारी एकमेव शाळा*

*सहकार विद्या मंदिर, जानेफळचा 100% निकाल*.

जानेफळ येथील सहकार विद्या मंदिरने इयत्ता10 वीच्या निकालात सलग चार वर्षांपासून 100 % निकालाची परंपरा जपली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या गुणवंतेचा ठसा उमटविला आहे.

या परीक्षेला शाळेतील एकूण 13 विद्यार्थी असून त्यापैकी 11 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. कु. भक्ती शरद वानखेडे हिने 91.60% प्रथम तर

तुषार रामेश्वर घाटे 90.60% द्वितीय क्रमांक तर अंकिता किशोर घाटे 89.20% तृतीय क्रमांक मिळविला. बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष. आदरणीय श्री राधेश्यामजी चांडक, बुलढाणा अर्बनचे विद्यमान अध्यक्ष मा. डॉ. सुकेशजी झंवर तसेच, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा. आदरणीय सौ. कमलताई झंवर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर रमेश हिवरकर सर, शाळेच्या स्थानिक

सल्लागार समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी

अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा यशस्वी निकाल

शक्य झाल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक हिवरकर

सरांनी दिली.

 

 

 

Leave a Comment