Home » Uncategorized » Mumbai: १० वर्षीय मुलीवर अत्याचार, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकला, त्याच्या गर्लफ्रेंडने Video शूट केला, मुंबई हादरली

Mumbai: १० वर्षीय मुलीवर अत्याचार, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकला, त्याच्या गर्लफ्रेंडने Video शूट केला, मुंबई हादरली

Share:

Last Updated:

Mumbai Crime: मुंबईत २४ वर्षीय आरोपीने २१ वर्षीय प्रेयसीच्या सहाय्याने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

मेघवाडी पोलीसमेघवाडी पोलीस
मेघवाडी पोलीस

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून आरोपीने व्हिडिओ शूट केल्याचे समोर आले आहे. या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे.

या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत २४ वर्षीय तरुणाला आणि २१ वर्षीय त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. २४ वर्षीय आरोपीने २१ वर्षीय प्रेयसीच्या सहाय्याने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

पीडित मुलीची आई एका केटरिंग सर्विस फर्ममध्ये सुपरवायझर म्हणून काम करते. १४ जून आणि १५ जून रोजी जेव्हा पीडित मुलीची आई कामावर गेली होती तेव्हा आरोपीने दहा वर्षीय मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. २४ वर्षीय आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला आणि तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकला. इतकेच नाही तर आरोपीच्या प्रेयसीने या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ शूट केला.

यानंतर आरोपीने मुलीवर टोकदार वस्तूने हल्ला केला. घटनेबाबत जर कोणाला माहिती दिली तर काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली. या घटनेनंतर आरोपीविरोधात मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत २४ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या २१ वर्षीय प्रेयसीला अटक केली आहे. अटक आरोपीची चौकशी मेघवाडी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Mumbai: १० वर्षीय मुलीवर अत्याचार, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकला, त्याच्या गर्लफ्रेंडने Video शूट केला, मुंबई हादरली

Source link

Leave a Comment