आमदार सिद्धार्थ खरात करणार आज मेहकर तालुक्यातील नुकसानीची पाही
गेल्या दोन दिवसात पडलेल्या
ढगफुटी सदृश्य पावसामुळे मेहकर व लोणार तालुक्यात शेती,पिके , पेरणी केलेले बियाणे सह इतरही मोठे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील या नुकसानीची आमदार सिद्धार्थ खरात आज शुक्रवार २७ जून रोजी पाहणी करणार आहेत. यामध्ये सावत्रा सकाळी ९ वाजता, जानेफळ सकाळी ९.४५ वाजता,उटी सकाळी १०.३० वाजता, वरवंड सकाळी ११ वाजता ,बोथा सकाळी ११.३० वाजता, देऊळगाव साखरशा दुपारी १२ वाजता, घाटबोरी दुपारी १ वाजता, आंध्रुड दुपारी १.३० वाजता,शेलगाव देशमुख दुपारी २ वाजता व डोणगाव दुपारी २.३० वाजता याप्रमाणे पाहणी दौरा असणार आहे. यादरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.तरी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.








