

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केली पाहणी.!
आज लोणार तालुक्यातील मौजे वडगांव तेजन,वेणी,गुंधा इत्यादी गांवामध्ये अतिवृष्टीमुळे प्रंचड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे संकटामुळे नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकरी बांधव यांच्या शी संवाद साधला.
नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी,यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे.
यावेळी मा.आ.संजयजी रायमुलकर,शिवसेना शेतकरी सेना प्रदेशअध्यक्ष श्री. धनंजय जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.बळीराम मापारी,तहसीलदार श्री. भूषण पाटील,शिवसेना ता.प्रमुख श्री.भगवान सुलताने,श्री.सुरेश वाळुकर,
श्री.दिलीपराव देशमुख,श्री. नंदकिशोर मापारी,श्री.शिव तेजनकर श्री. हेमराज लाहोटी,श्री. मनोहर भानापुरे,
श्री.मारोतराव धांडे,व शिवसेना पक्षाचे आजी-माजी प्रमुख पदाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी,शेतकरी बांधव,उपस्थित होते.








