Home » Uncategorized » बुलढाणा » महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन..

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन..

Share:

📍 पंढरपूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील मुख दर्शन घेतले. मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

मंदिर व परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चौफाळा ते मंदिरापर्यंत दर्शनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे चालत गेले.

 

Leave a Comment