शेतकरी अडचणीत असताना पुन्हा पिक विमा भरत आहे. तरी सीएससी सेंटर चालक यांच्याकडून होत आहे शेतकऱ्यांची लूट.प्रति शेतकरी शंभर रुपये प्रमाणे 7/12 असेल तर 40 रुपये प्रमाणे पैसे घेतात. एकूण रक्कम 140 रुपये प्रमाणे घेत आहेत.
आधीच शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे.
सीएससी सेंटर चालक व व इतर अधिकारी यांची एकजूट आहे. यावरून दिसत आहे.
अधिकारी कोणत्याही सीएससी चालकावर कसले प्रकारचे कारवाई करत नाही. म्हणजे या सीएससी चालकाकडून जे वरिष्ठ अधिकारी असतील. त्यांना काही हफ्ते ते दिले जात नाही. असे प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडत आहे….
ही बातमी सर्वात अगोदर भूमिपुत्र मराठी न्यूज यांचे मुख्य संपादक सागर शिंदे पाटील यांनी प्रकाशित केली आहे.
त्यांच्याकडे सीएससी सेंटर असताना सुद्धा ते कित्येक वर्षे झालीत ते शेतकऱ्यांची मोफत मध्ये विमा भरणा करत आहेत.
यावर्षी शासनाने एक रुपये विमा हा बंद करण्यात आला आहे.
आता वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळे दर आहेत.
ते दर देत असतानी ज्याप्रकारे शेतकऱ्यांनी विमा भरला त्याप्रकारे प्रतिपावती तीस रुपये कमिशन हे विमा कंपनी csc सेंटरला त्यांना देत आहे.
जर कोणी शेतकऱ्याकडून विमा रक्कम व्यतिरिक्त पैसे जास्त घेत असेल.
तर शेतकरी मंडळींनी तहसीलदार , व विमा कंपनीच्या अधिकाराकडे तक्रार करावी.
अन्यथा मुख्य संपादक सागर शिंदे पाटील यांच्या मोबाईल नंबर वर तक्रार दाखल करावी.
मोबाईल नंबर 9545207601 या व्हाट्सअप नंबर वर आपली तक्रार लेखी स्वरूपात टाकावी…








