Home » Uncategorized » छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक गौरव, महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण!

छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक गौरव, महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण!

Share:

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवताना निर्माण केलेले १२ दुर्ग आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत! ही केवळ ऐतिहासिक मान्यता नाही, तर आपल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या आणि शौर्याच्या खुणांना जागतिक स्तरावर मिळालेला मान आहे.

रायगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग अशा महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांसह तामिळनाडूतील जिंजी किल्ला यामध्ये समाविष्ट झाला आहे. या किल्ल्यांचे सामरिक महत्त्व, स्थापत्यशास्त्रीय वैभव आणि स्वराज्याचे प्रतीक म्हणून त्यांचे स्थान अद्वितीय आहे.

या यशामध्ये केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीचा आणि राज्य सरकारच्या समन्वयाचा मोठा वाटा आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांचे यासाठी विशेष योगदान राहिले.

महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि वारसा हा आमचा अभिमान आहे आणि तो आता जगाच्या नकाशावर अधोरेखित झाला आहे.

॥ जय भवानी जय शिवाजी ॥

Leave a Comment