4 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थविषयक दूरदृष्टी असलेले नेतृत्व, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ ‘डॉ. मनमोहन सिंग फेलोशिप’ या नावाने लीडरशिप डेव्हलपमेंट फेलोशिप कार्यक्रम जाहीर केला. या प्रतिष्ठित फेलोशिपसाठी देशभरातून परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून केवळ 50 जणांची निवड करण्यात आली आहे.
नितेश भाऊ घोलप यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की, या मानाच्या फेलोशिपसाठी नितेश भाऊ घोलप निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केली आहे. भारताच्या एका यशस्वी, विद्वान, आणि दूरदृष्टी असलेल्या माजी पंतप्रधानांच्या नावाने दिली जाणारी ही फेलोशिप मला मिळणे, हे नितेश भाऊ घोलप राजकीय प्रवासातील एक अविस्मरणीय वळण ठरले आहे.
NSUI पासून सुरू झालेला नितेश भाऊ घोलप यांची काँग्रेसमधील प्रवास आज या टप्प्यावर पोहोचल्याने मी अत्यंत भावुक आहे. या प्रवासात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व संधी देणाऱ्या त्यांनी सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुन खरगे साहेब,लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री.राहुलजी गांधी,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस श्री. मुकुलजी वासनिक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ,बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. राहुलभाऊ बोंद्रे,श्री.सत्येंद्रजी भुसारी यांच्या विश्वासामुळेच ही संधी नितेश भाऊ घोलप यांना मिळाली.ही फेलोशिप केवळ प्रशिक्षणाची संधी नसून, काँग्रेस च्या राजकारणाला नव्या विचारसरणीचं, नव्या नेतृत्वाचं वळण देण्याची जबाबदारीही आहे, हे पूर्णतः जाणून नितेश भाऊ घोलप यांना ही संधी स्वीकारत आहे.








