🗓️ २० नोव्हेंबर २०२५ |📍मेहकर!
आज बालाजी मंदिर येथे मेहकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे मेहकर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री.अजय अरविंद उमाळकर आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ मा केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा खासदार श्री प्रतापराव जाधव साहेब व मा.आ.संजयजी रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आला.
या महत्त्वाच्या प्रसंगी शिवसेना पक्षाचे मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. उपस्थित जनसमुदायाचा अभूतपूर्व उत्साह, जोश आणि जल्लोष गगनाला भिडला होता. शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दर्शवला.
यावेळी शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








