Home » Uncategorized » बुलढाणा » सावधान! ट्रायल रूममध्ये महिलेचे चित्रीकरण करणाऱ्या दुकानदाराला कामशेत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सावधान! ट्रायल रूममध्ये महिलेचे चित्रीकरण करणाऱ्या दुकानदाराला कामशेत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Share:

पुणे (कामशेत): खरेदीसाठी गेलेल्या महिलेचे कपडे बदलताना CCTVच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार कामशेत येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’चा मालक मुकेश मुथा याला अटक केली आहे. आरोपीने केवळ चित्रीकरणच केले नाही, तर पीडितेने जाब विचारला असता तिला दमदाटीही केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपीच्या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश मुथा याने स्टोअर रूममध्ये CCTV कॅमेरा असल्याचे माहिती असूनही, पीडितेस तिथे कपडे बदलण्यासाठी जाण्यास सांगितले. महिला कपडे बदलत असताना तिचे जाणीवपूर्वक चित्रीकरण करून विन*यभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या विकृत प्रकारानंतर आरोपीने पीडितेला धमकावल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७७ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुकेश मुथाला बेड्या ठोकल्या..

Leave a Comment