Home » Uncategorized » बुलढाणा » अपघाताच्या त्या क्षणी… माणुसकीचं खरं रूप दिसलं!

अपघाताच्या त्या क्षणी… माणुसकीचं खरं रूप दिसलं!

Share:

आज मेहकर समृद्धी टोल प्लाझा येथे मुंबईवरून यवतमाळकडे जात असताना समृद्धी टोल प्लाझा येथे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेच्या वेळी मा. आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर यांचे चिरंजीव युवानेते निरज रायमुलकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली गाडी थांबवली…

घटनास्थळी पोहोचून त्यांनी जखमींची तात्काळ विचारपूस केली, परिस्थितीची गंभीरता ओळखून मेहकर पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे त्वरित संपर्क साधला आणि ॲम्बुलन्स बोलावून जखमींना मदत पोहोचवली.

यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनीही तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला.

अशा कठीण प्रसंगी धावून जाणं, माणुसकी जपणं आणि जबाबदारीने वागणं — हाच खरा नेतृत्वाचा गुण आहे.
निरज रायमुलकर यांची ही तत्परता आणि संवेदनशीलता खरंच मनाला भिडणारी आहे…

देव सर्व जखमींना लवकर बरे होण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना.

Leave a Comment