Home » Uncategorized » Property Rules : मालमत्तेच्या कागदपत्रावर सही करताना 2 गोष्टी नक्की तपासा अन्यथा प्रॉपर्टी हातातून जाणार

Property Rules : मालमत्तेच्या कागदपत्रावर सही करताना 2 गोष्टी नक्की तपासा अन्यथा प्रॉपर्टी हातातून जाणार

Share:

Last Updated:

Property Rules : जमीन खरेदी करताना अनेकदा लीज (भाडेपट्टा) आणि रजिस्ट्री (नोंदणीकृत) अशा दोन संकल्पनांचा उल्लेख केला जातो. मात्र, अनेक खरेदीदारांना या दोघांतील नेमका फरक माहिती नसतो.

agriculture newsagriculture news
agriculture news

मुंबई : जमीन खरेदी करताना अनेकदा लीज (भाडेतत्व) आणि रजिस्ट्री (नोंदणीकृत) अशा दोन संकल्पनांचा उल्लेख केला जातो. मात्र, अनेक खरेदीदारांना या दोघांतील नेमका फरक माहिती नसतो. या अज्ञानामुळे अनेकजण भाडेपट्ट्यावर असलेली जमीन खरेदी करतात आणि नंतर त्याचे कायदेशीर व आर्थिक दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कोणतीही मालमत्ता घर, फ्लॅट, दुकान किंवा जमीन खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे आणि योग्य चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे.

लीज जमीन म्हणजे काय?

लीज म्हणजे सरकारी मालकीची जमीन जी काही काळासाठी भाडेपट्ट्यावर दिली जाते. यामध्ये मालमत्तेचा पूर्ण हक्क खरेदीदाराकडे नसतो. जमीन केवळ ठराविक उद्दिष्टासाठी वापरण्याची परवानगी दिली जाते.लीज कालावधी पूर्ण झाल्यावर, नूतनीकरणासाठी सरकारी प्रक्रियेचे पालन करावे लागते. लीज जमीन इतर कुणाला विकता किंवा हस्तांतरित करता येते का, हे लीजच्या अटींवर अवलंबून असते. अशा जमिनींवर व्यवहार करताना भविष्यात मालकी हक्क मिळेलच याची शाश्वती नसते.

रजिस्टर्ड जमीन म्हणजे काय?

नोंदणीकृत जमीन ही खरीदी-विक्रीच्या व्यवहारानंतर पूर्णतः खरेदीदाराच्या नावावर नोंद होते. या जमिनीवर खरेदीदाराचा कायदेशीर मालकी हक्क प्राप्त होतो.एकदा जमीन रजिस्ट्री झाली की, ती मालमत्ता विकणे, गहाण ठेवणे,हस्तांतरण करणे शक्य असते.या व्यवहारात साक्षीदार,दस्तऐवज आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

जमीन खरेदीपूर्वी काय करावे?

जमीन लीजवर आहे की रजिस्टर्ड याची चौकशी करा.

दस्तऐवजांची नोटरी की रजिस्ट्री याची खातरजमा करा.

जमीन रजिस्टर्ड असल्यासच पूर्ण मालकी अधिकार मिळतो.

लीज जमीन घेताना सरकारी अटी, कालावधी व हस्तांतरण अटी काळजीपूर्वक वाचा.

तज्ञ वकील किंवा जमीन व्यवहार सल्लागाराचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या/कृषी/

मालमत्तेच्या कागदपत्रावर सही करताना 2 गोष्टी नक्की तपासा अन्यथा प्रॉपर्टी हातातून जाणार

Source link

Leave a Comment