Home » Uncategorized » Mumbai News : मुंबईत माणुसकीला काळिमा; आजारी आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं!

Mumbai News : मुंबईत माणुसकीला काळिमा; आजारी आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं!

Share:

Last Updated:

Mumbai News : त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या 60 वर्षीय आजीला तिच्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे

मुंबईत माणुसकीला काळिमा; आजारी आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं!
मुंबईत माणुसकीला काळिमा; आजारी आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं!
मुंबईत माणुसकीला काळिमा; आजारी आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं!

सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई: देशाची आर्थिक राजधानी आणि माणुसकीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मुंबईत एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या 60 वर्षीय आजीला तिच्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यशोदा गायकवाड असं या वयोवृद्ध महिलेचं नाव आहे. सध्या त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे आणि त्या शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे अशक्त अवस्थेत सापडल्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा गायकवाड या मालाड परिसरात आपल्या नातवासोबत राहत होत्या. मात्र, कोणत्यातरी कारणामुळे त्यांच्या नातवाने त्यांना कचऱ्यात टाकून दिलं आणि घटनास्थळावरून निघून गेला. ही घटना पाहणाऱ्या काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि त्यामुळे वेळेत मदत मिळू शकली. आजीला असलेल्या आजारामुळेच तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिल्याची चर्चा आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आजीची प्रकृती पाहता त्यांनी तिला कूपर रुग्णालयात दाखल केले.

सध्या पोलिस यशोदा गायकवाड यांच्या कुटुंबाचा शोध घेत असून, त्यांच्या नातवाची ओळख पटवण्याचे आणि त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण असून, वृद्धांसोबत होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Source link

Leave a Comment