मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.मा.श्री.अजित दादा पवार साहेब. महाराष्ट्र राज्य.मा.श्री.जिल्हाधिकारी साहेब. बुलढाणा जिल्हा.मा.श्री.जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब.बुलढाणा जिल्हा.
मार्फत :- मा.श्री.उपविभागीय अधिकारी खामगाव ता.खामगांव जी.बुलढाणा
विषय :- जळगाव जामोद येथील स्व.पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करणे बाबत.
निवेदन सादर कर्ते :- सकल मराठा समाज खामगांव ता.खामगांव जी.बुलढाणा
खामगांव शहर व ग्रामीण परिसरातील रहिवाशी समस्त सकल मराठा समाज बांधव आपणास या लेखी निवेदना द्वारे विनंति करीत आहोत की. दिनांक 3 मे 2025 ला जळगाव जामोद येथील रहिवासी पंकज उत्तमराव देशमुख यांचे त्यांच्याच शेतात छोट्याश्या झाडाला मृत शरीर लटकवीलेले दिसले.त्या मृत शरीराचे पाय जमिनीवर टेकलेले होते.त्यांच्या शरीरावर अनेक जखमा व मुक्कामार लागलेल्या खुणा दिसत होत्या.सोबतच काना मागुन रक्तस्तराव होत होता.हाताची बोटे मोडलेली दिसत होती.हातावर अग्नीचे चटके दिल्या प्रमाणे जखमा दिसत होत्या.तसेच त्यांचे तळपायाच्या जखमा रक्ताने माखलेल्या होत्या.असे सदृश्य वास्तव चित्र घटना स्थळी असताना.मृत पंकज देशमुख यांच्या शरीराचे पोस्टमार्टम जळगाव जामोद येथील उपजिल्हा रुग्णालयात न करता तसेच मृत पंकज देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांना विश्वासात न घेता अकोला येथे नेऊन त्याचे पोस्टमार्टम केले. अश्या या प्रकरणातली बऱ्याचश्या गोष्टी या घटने बाबत संशय निर्माण करणाऱ्या आहेत.या मुळेच स्व.पंकज देशमुख यांच्या पत्नी सदर प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मागणी वारंवार करीत आहेत.आम्ही सुध्दा त्यांच्या या मागणीचे समर्थन करीत आहोत तरी आपण तत्काळ सदर प्रकरणाची सी आय डी चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करून कठोरात कठोर शासन करावे या करिता संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करुण स्व.पंकज देशमुख यांच्या पत्नी व मुलांना न्याय मिळवुन देण्यासाठी सहकार्य करावे या करिता लेखी निवेदन सादर केले आहेत








