Share:

बीडचे खा. बजरंगजी सोनवणे, मा. मंत्री राजेशजी टोपे तसेच मा. मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी आज स्व.डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचे स्मारक ‘लोकतीर्थ’ तसेच डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा झाली.

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांची दूरदृष्टी, सहकार चळवळीतील योगदान आणि ग्रामीण भागातील शिक्षण व विकासासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांनी केला. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्याकडून नुकताच गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उच्च साखर उताऱ्याच्या माध्यमातून “उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता” पुरस्कार मिळालेबद्दल सर्वांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल आभार मानले. भविष्यातही अशीच गुणवत्ता टिकवून ठेवत कारखाना हीच घोडदौड कायम राखेल अशी ग्वाही दिली.

Leave a Comment