Home » Uncategorized » बुलढाणा » शेगावच्या गायत्री रोहनकरला “मिस एशिया वर्ल्ड 2025” चा मुकुट! 🌟

शेगावच्या गायत्री रोहनकरला “मिस एशिया वर्ल्ड 2025” चा मुकुट! 🌟

Share:

दुबई येथील ब्रिस्टोल हॉटेल, देरा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत “मिस एशिया वर्ल्ड 2025” हा मानाचा किताब पटकावून गायत्री रोहनकर हिने संपूर्ण महाराष्ट्रासह आपला बुलढाणा जिल्हा आणि विशेषतः शेगावचा मान अभिमानाने उंचावला आहे.

गायत्रीचा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि सामाजिक जाणिवा या स्पर्धेत ठळकपणे झळकल्या. तिच्या या गुणांमुळे ती केवळ एक सौंदर्यवती न राहता, तर आजच्या तरुणाईसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

मराठी मातीतील या सुपुत्रीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळवलेला हा सन्मान संपूर्ण विदर्भासाठीही गौरवाचा क्षण आहे. तिच्या यशामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असून, मराठी अस्मितेचा झेंडा संपूर्ण आशियात दिमाखाने फडकला आहे.

गायत्रीने आपल्या कष्ट, आत्मविश्वास आणि प्रतिभेच्या जोरावर हे सिद्ध केलं आहे की – आपल्या मातृभूमीतून जागतिक व्यासपीठ गाजवणारी असामान्य गुणवत्ता जन्म घेऊ शकते.

हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..!!

Leave a Comment