Home » Uncategorized » बुलढाणा » *दोषी ग्रामसेवकांच्या निलंबन मागे घेण्यास तीव्र विरोध;* *प्रशासनाने दबावाला बळी न पडता शिस्तभंगाची कारवाई कायम ठेवावी – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा

*दोषी ग्रामसेवकांच्या निलंबन मागे घेण्यास तीव्र विरोध;* *प्रशासनाने दबावाला बळी न पडता शिस्तभंगाची कारवाई कायम ठेवावी – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा

Share:

प्रतिनिधी मेहकर

दिनांक: ८/८/२०२५  मंगळवार

ग्रामपंचायत डोणगावचे ग्रामसेवक श्री. डी. टी. तांबारे व ग्रामपंचायत गोहगावचे ग्रामसेवक श्री. विजयकुमार धोंडगे यांच्याविरोधात कार्यकाळात झालेल्या गंभीर गैरकारभार, आर्थिक अपहार, व जनतेच्या सेवेत कसूर केल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी करून त्यांना निलंबित केले होते.

मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती मेहकर व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी कायदेशीर प्रक्रिया व चौकशी अहवालाच्या आधारावरच ही निलंबन कारवाई केली होती.

परंतु, सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन मेहकर शाखेच्या वतीने प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असून दोषी ठरविण्यात आलेल्या या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्याची मागणी होत आहे.

याविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून, खालील मागण्या यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत:

🔹 निलंबनाची कारवाई कायम ठेवावी

🔹 चौकशीत दोषी आढळलेल्या ग्रामसेवकांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी

🔹 कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक दबावाला बळी न पडता प्रशासनाच्या स्वायत्ततेचे संरक्षण करावे *अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल*

संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सदर निवेदनावर सहदेव लाड, गणेश गारोळे, कैलास ऊतपुरे, देवेंद्र आखाडे, अरविंद दांदडे, जुबेर देशमुख,सलीम शहा, प्रवीण ऊतपुरे, जुबेर देशमुख, नंदू जाधव, सचिन असाबे, संदीप असाबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment