Home » Uncategorized » बुलढाणा » बुलडाणा आगारात ५ नव्या लालपरींचे माननीय आमदार संजयजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते लोकार्पण

बुलडाणा आगारात ५ नव्या लालपरींचे  माननीय आमदार संजयजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते लोकार्पण 

Share:

आज दिनांक १२ जुलै २०२५ रोजी माझ्या प्रयत्नातून बुलडाणा आगारामध्ये ५ नवीन एस.टी. मध्ये नवीन बसेस (लालपरी) दाखल झाल्या.असून त्यांचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार संजयजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते पार पडला. नागरिकांची वाढती वाहतूक गरज लक्षात घेता, या बसेसमुळे ग्रामीण व शहरी प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष ओमसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, शिवसेना नेते विजय अंभोरे, विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाठ, आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग आणि एस.टी. विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थीत हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या शब्दांनुसार भविष्यात अजून नवीन बसेस उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

लोकसेवेसाठी अशाच पद्धतीने सातत्याने  कार्य करत राहीन असे ते यावेळी बोलले..

 

Leave a Comment