.बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर:-केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या पाठपुराव्याला यश.. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मागील जून २०२५ या कालावधीत ढगफुटीसदृश्य व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान झाले होते.
केंद्रीय मंत्री ना.प्रतापरावजी जाधव साहेब व मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे व महसूलमंत्री मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेवून नुकसान भरपाई ची शासनाकडे मागणी केली होती आज पाठपुराव्याला यश आले असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दि.६ ऑगस्ट २०२५ रोजी परीपत्रक काढून ७४ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी ही दि.२५ व २६ जून २०२५ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघात सरासरी २१२ मिमी पावसाची नोंद झाली होती. केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब व मा.आ.संजयजी रायमुलकर यांच्या मागणी नुसार मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना तब्बल ६६ कोटींची नुकसानभरपाई मदत मिळणार आहे.
*मेहकर मतदारसंघातील एकूण ६५,६०१ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून ६६ हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये जमीन खरडून जाणे,फळबागांचे नुकसान आणि गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणाऱ्या सुमारे ६ हजार शेतकऱ्यांचाही समावेश केला आहे.*या तातडीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब मा.ना.आजितदादा पवार व महसूलमंत्री मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे व महायुती सरकार यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा निर्णय शेतकरी बांधवांना दिलासा देणारा असल्याची भावना व्यक्त करतो.








