Home » Uncategorized » *ध्यास विकासाचा सन्मान कर्तुत्वांनाचा लोकमत बुलढाणा गौरव*

*ध्यास विकासाचा सन्मान कर्तुत्वांनाचा लोकमत बुलढाणा गौरव*

Share:

मा.श्री मोहन जिवनराव धोटे

( सामाजिक कार्यकर्ते )

लोकमत बुलढाणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी

मंचावर आमदार अमित झनक साहेब, आमदार मनोज कायंदे साहेब, जिल्हाधिकारी अकोला माननीय वर्षा मीना मॅडम जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बगवे लोकमतचे अकोला युनिट हेड आलोक कुमार शर्मा साहेब सिन्हा साहेब, पांडे साहेब , दिवेकर साहेब, मिरगे साहेब प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते युवा नेते मोहन जिवनराव धोटे यांना लोकमत बुलढाणा गौरव या पुरस्काराने अकोला येथे हॉटेल व्हि.एस. इम्पेरियल सन्मानित करण्यात आले.युवा नेते सामाजिक कार्यकर्ते मोहन धोटे संस्थापक अध्यक्ष अंबिका महिला अर्बन जानेफळ, ता मेहकर जिल्हा बुलढाणा , कार्यकारी संचालक विदर्भ समृद्धी कृषी प्रोडूसर कंपनी चे श्री मोहन धोटे यांनी अंबिका महिला अर्बनच्या माध्यमातून विविध सामाजिक व उपक्रम राबवून संकटात असलेल्या अनेकांना मदतीचा हात आतापर्यंत दिला आहे.

80%समाजकारण व 20% राजकारण यातून नागरिकांशी सुसंवाद साधणे त्यांच्या सुखात दुखात धावून जाणे यामुळे मोहन धोटे यांचे नाव जानेफळसह मेहकर तालुक्यात लोकप्रिय झाले आहे.

अंबिका महिला अर्बन, विदर्भ समृद्धी कृषी प्रोडूसर कंपनी, समृद्धी ॲक्वा इंडस्ट्रीज, कृषी साम फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. या कामाची दखल घेऊन लोकमत परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते मोहन धोटे यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी लोकमत तालुका प्रतिनिधी अमर राऊत, बंटी पाटील धोटे उपस्थित होते.

Leave a Comment