गेली ४० वर्षे मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढत आलो आहे. शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता म्हणून मला शेतकऱ्यांचे दुःख कळते. गारपीट, दुष्काळ यासारख्या संकटांमध्ये मी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलो, मोर्चे काढले, शासनासोबत लढा दिला.”बाप” हा शब्द ग्रामीण बोलीतील प्रचलित शब्द आहे, जो मी शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात खोटे ट्रोलिंग करणाऱ्या १०-१२ जणांच्या टोळक्यासाठी वापरला. हे लोक सरकारच्या योजनांचा लाभ घेतात आणि तरीही विरोधकांच्या सांगण्यावरून खोटेपणा पसरवतात.मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे, माझे सर्वस्व शेतकऱ्यांमुळे आणि सर्वसामान्य जनतेमुळे आहे याचा मला अभिमान आहे! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मी यंदाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात प्रथम मांडला. सत्तेत असो वा नसो, शेतकऱ्यांच्या बाजूने माझी भूमिका कधीही बदलणार नाही!जर चुकूनही माझ्या बोलण्याने शेतकऱ्यांचा विषय निघाला, तर मी हजार वेळा माफी मागायला तयार आहे. पण शेतकऱ्यांविरोधी मी कधीच बोललो नाही आणि बोलणारही नाही! विरोधकांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण सत्य नेहमीच समोर येईल!
*शेतकरी माझा श्वास, त्यांच्यासाठी मी लढत राहीन!* 








