भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांचे विकासाभिमुख धोरण व राज्याचे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल माझ्या उपस्थितीत चिखलीचे माजी नगरसेवक श्री. दीपक खरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नेहा खरात, श्री. राकेश सावजी, श्री. शेख इरफान सर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी सर्व नवप्रवेशितांचे भाजपात स्वागत करून भविष्यातील राष्ट्रकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. नेहा खरात या माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या हिरकणी महिला अर्बन या पतसंस्थेमध्ये संचालिका आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये चिखलीचा गड भाजपाला जिंकून देण्यात त्या मोलाची भूमिका बजावतील असा विश्वास आहे.
“भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष!”
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून या पक्षामध्ये उचित कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना जपले जाते, या पक्षामध्ये कार्यकर्ते कोणत्याही व्यक्तीसाठी काम करत नाहीत तर ते एका ध्येयासाठी काम करतात त्यात “राष्ट्र प्रथम” हे तत्त्व स्वीकारून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचा वस्तूपाठ घालून दिला जातो. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाची ध्येय धोरणे ही नेहमी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित असतात म्हणून भाजप या पक्षाची नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
या पक्षप्रवेश सोहळ्यास सर्वश्री भाजपा चिखली मतदार संघाच्या लाडक्या आमदार श्वेता ताई महालेभाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, डॉ. प्रतापसिंह राजपूत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रकाश महाराज जवंजाळ प्रदेश कार्यकारिणी सदस्य, पंडितदादा देशमुख भाजप नेते, सुरेशआप्पा खबुतरे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सुरेंद्र पांडे ज्येष्ठ नेते, ॲड. मंगेश व्यवहारे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, संजय गाडेकर, विलास घोलप, निलेश अंजनकर, सुदर्शन खरात, सुधीर तांबट, दत्ता सुसर, विजय नकवाल, सुभाषआप्पा झगडे, शेख करामत, संजय आतार, मंदार बाहेकर, युवराज भुसारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.










