
कृषी अधिकारी, ग्रामसेवक, व तलाठी, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी बांधवांची भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी, ग्रामसेवक,तलाठी, कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वे करत आहेत..
मुंदेफळ तालुका मेहकर येथे थेट अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मनधरणी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यावेळी कृषी अधिकारी झोरे साहेब, मुंदेफळ येथील ग्रामसेवक भारत निकम साहेब, व तलाठी सरदार साहेब, थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत.
त्यावेळी सर्वे करताना गावचे सरपंच पती अनंत चांदणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चांदणे पाटील, राजेश चांदणे, संतोष चांदणे, गोपाल फुंरगे, प्रवीण गजानन चांदणे, अर्पित चांदणे, संजीव अर्जुन चांदणे, सागर वसंतराव चांदणे, सागर शिंदे पाटील व इतर ज्यां शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे ते सर्व शेतकरी हजर होते……









