अमरावती : टेनिस क्रिकेट असोसिएशन
महाराष्ट्र सन २०२५-२६ च्या वार्षिक सहविचार सभा क्रांतिकारी शैक्षणिक संकुल म्हसवड सातारा येथे उत्साहात पार पडली. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भासरतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव तथा महाराष्ट्र सचिव मिनाक्षी गिरी यांनी सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेट बद्दल माहिती व नविन नियमांबदल व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे नियोजन सांगितले. या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य अंतर्गत विभाग प्रमुख व सचिव यांची निवड करण्यात आली. अमरावती विभाग प्रमुख पदी अमरावतीचे नितीन सराफ तर सचिवपदी प्रा.एन.डी.पाटील माध्यमिक विद्यालय हिवरा खुर्द ता. मेहकर जि. बुलडाणाचे क्रीडा शिक्षक गोवर्धन राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेटचे फाऊंडर कन्हैया गुजर, भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मिनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र असोसिएशनच्याअमरावती विभागीय सचिवपदी गोवर्धन राठोड सर यांची निवड अध्यक्ष मयुरी गिरी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. दत्ता भुतेकर, सचिव रेखा भुतेकर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या….








