Home » Uncategorized » बुलढाणा » *केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिंरवी झेंडी दाखवली….*

*केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिंरवी झेंडी दाखवली….*

Share:

 

📍खांमगाव शहर

गुरुवार दि.३ जुलै २०२५

आज खांमगाव शहरातील रेल्वे स्थानक येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर च्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहून श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिंरवी झेंडी दाखवली व विठ्ठल भक्तांशी संवाद साधला.

दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विठ्ठलभक्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. विठ्ठल भक्ताचा प्रवास सोईचा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने दरवर्षी खांमगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सोडण्यात येते.

विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी उपस्थित राहून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली आहे.

यावेळी शिवसेना,युवासेना पक्षाचे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment