Home » Uncategorized » बुलढाणा » स्थानीक _स्वराज्य_निवडणूक_२०२५ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीकरण, कार्यकर्त्यांचे नियोजन, बैठक पार पडली

स्थानीक _स्वराज्य_निवडणूक_२०२५  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीकरण, कार्यकर्त्यांचे नियोजन, बैठक पार पडली

Share:

आज दिनांक १२ जुलै २०२५ रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली.

ही बैठक लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव जाधव साहेब, शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ साहेब तसेच  आमदार संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीकरण, कार्यकर्त्यांचे नियोजन, जनसंपर्क वाढवणे आणि निवडणूक तयारी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

आमदार संजयजी गायकवाड यांनी भूमिकेचे स्पष्टीकरण दिले, दिशादर्शन केले आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट जबाबदाऱ्या सोपविल्या.

यावेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना नेते विजय अंभोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, अनुजाताई सरकटे, शारदाताई खानझोडे, श्रीनिवास खेडेकर तसेच जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment