Home » Uncategorized » ,शेती » मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तयार होत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पाहणी केली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तयार होत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पाहणी केली.

Share:

📍 खोपोली, #रायगड |

यावेळी ऑक्टोबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे दरम्यान तयार होणारा मिसिंग लिंक प्रकल्प हा दोन शहरातील अंतर कमी करणारा असा प्रकल्प आहे. हा एक गेमचेंजर प्रकल्प असून या प्रकल्पाद्वारे दोन शहरातील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळही अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

अत्यंत आव्हानात्मक असा प्रकल्प एमएसआरडीसीने आपल्या हाती घेतला असून त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे ८५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असताना १८५ मीटर उंचीचे खांब उभे करून त्यावर केबल स्टडेड ब्रिज तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच लोणावळा तळ्याखालून जाणारा आशिया खंडातील सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा देखील तयार करण्यात आला असून ते देखील या प्रकल्पाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे घाट रस्त्यात अडकून पडण्याचा त्रास आता कायमचा दूर होणार असून पुणे-मुंबई प्रवास अधिक गतिमान होणार आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, एमएसआरडिसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर तसेच एमएसआरडिसी, एफकोन कंपनीचे अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Comment