जालना प्रतिनिधी
जाफ्राबाद तालुक्यातील सावरखेडा गोंदण या गावी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत दिन. ३० वार मंगळवारी श्री नरेंद्र दामोदरदास मोदीजी यांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधुन .मुलांना कला या क्षेत्रात वाव मिळण्यासाठी माजी सरपंच श्री कैलास पाटील वायाळ यांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा तंटामुक्ती अध्यक्ष व गोरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष श्री नंदकिशोरजी महाराज वायाळ पाटील हिंदू धर्म रक्षक यांनी आपले विचार व्यक्त करीत. असताना राष्ट्रसंता च्या विचाराचे समर्थन करीत एक तरी अंगी असू दे कला नाही तरी व्यर्थ हो का जन्माला आला चित्रामुळे चित्र चरित्र व चारित्र्य निर्माण होण्यासाठी मदत होते.व मोदीजी यांचे विचार व कार्य देशाची उंची वाढविण्यासाठी व युद्धपातळीवरती प्रगती विकसनशील भारत बनविण्यासाठी मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन वायाळ महाराज यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच व्यक्ती व मानवी जीवन हे पदाने मोठे होत नसून त्यांच्या कृती कार्याने मोठे होत असते हे आपण या निमित्ताने स्मरण ठेवावे त्यामुळे आज राष्ट्रपिता ही पदवी महात्मा गांधी यांना समाजसेवा कार्यामुळे शोभून दिसत असल्याचे विधान सुद्धा यावेळी नंदकिशोर महाराज वायाळ पाटील यांनी केले.
तसेच आयुष्यमान भारत या मोदीजींच्या संकल्पना अंतर्गत मुलांसाठी आज सर्दी ताप खोकला थंडी ताप घसा खवखवणे हात पाय दुखणे मळमळ उलटी कप या सर्व आजारावरती प्राथमिक स्वरूपाचे गोळ्या औषधे वाटप करण्यात आले यावेळी आरोग्य सेवक अधिकारी श्री पंकज पायघन साहेब कैलास पाटील वाया ल श्री नाना पाटील पंडित सर पंच प्रतिभा नितीन वायाळ तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश वायाळ शालेय समिती श्री नंदकिशोर पाटील वायाळ, पंढरी वायाळ, योगेश वायाळ ,गणेश पालकर, हरिदास पाटील वायाळ, खंडू पाटील वायाळ ,विद्यानंद वायाळ, बिडवे मॅडम व विद्यमान शिक्षक मोहन खरात सर आदरणीय वायाळ सर निमसे सर शिंगणे सर अंभोरे मॅडम संदीप मिसाळ रमेश उबाळे गणेश पालकर भगवान वाया ग्रामसेवक बाहेकर साहेब कृष्णा वायाळ पंडित मामा यासह आदी गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी खरात सर यांनी सर्वांचे आभार मानले त विजय हो विजय हो भारत देश हमारा या राष्ट्र संतांच्या गीताने समारोप करण्यात आला….







