Home » Uncategorized » बुलढाणा » *नानाभाऊ आपण केलेला वारकरी भक्तांचा सन्मान लक्षात राहील हिंदूधर्मभूषण नंदकिशोर जी महाराज वायाळ पाटील*

*नानाभाऊ आपण केलेला वारकरी भक्तांचा सन्मान लक्षात राहील हिंदूधर्मभूषण नंदकिशोर जी महाराज वायाळ पाटील*

Share:

जालना प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा गोंदण या गावी नवरात्री विशेष विजयादशमी दसरा या साडेतीन मुहूर्त पैकी एका फुल मुहूर्ताचे परम औचित्य साधून गावचे भूमिपुत्र असणारे श्री नाना भुजंगराव पाटील पंडित यांनी वारकरी सन्मान व नवरात्री प्रित्यर्थ महाराष्ट्रातील नामांकित प्रसिद्ध युवा कीर्तनकार श्रद्धेय हरिभक्तिपरायण नंदकिशोर महाराज देवकर कोपरगाव कुंभारी यांचे विशेष किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील संपूर्ण जय हनुमान भजनी मंडळ व वारकरी भाविक भक्तांचा सन्मान सोहळा हा विशेष आकर्षण केंद्रबिंदू ठरला. सन्मानामध्ये रुमाल टोपी गंध अक्षदा बुक्का व मानाचे श्रीफळ देण्यात आले संत सांगतात. की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी मस्तक हे चरणावरी या वारकरी संतांच्या किंबहुना संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा या संतवचनाप्रमाणे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नानाभाऊ पंडित यांनी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यानिमित्ताने महाराष्ट्र गोरक्षण सेना समिती प्रदेशाध्यक्ष हिंदू धर्मभुषण श्री नंदकिशोर जी महाराज वायाळ पाटील यांनी नानाभाऊ आपण केलेला वारकऱ्यांचा व भाविक भक्तांचा सन्मान हा भविष्यात लक्षात राहील तत्वतः शिक्षण क्षेत्रासोबत आपल्या हातातून देव देश धर्म आणि गावाची सामाजिक सेवा घडो असे भावनिक गौरव उद्गार यावेळी व्यक्त केले यावेळी श्री नंदकिशोर महाराज देवकर श्री नंदकिशोर जी महाराज वायाळ पाटील, कैलास पाटील वायाळ, हरिदास पाटील वाया ळ ,सुभाष पाटील, खंडू पाटील, सरपंच नितीन पाटील वाया ळ, संतोष फौजी शनफड, आप्पा सुदाम वायाळ, गजानन वायाळ, पुरुषोत्तम वायाळ, रमेश उबाळे, रतन उबाळे, विनायक पालकर, गणेश पालकर ,संजय शेळके ,रामदास पंडित, हनुमान पंडित ,उपस्थितांमध्ये पत्रकार श्री पवन वायाळ ,मंगेश वायाळ, प्रवीण उबाळे, निवृत्ती वाया ळ, सोपान वायाळ ,सोपान गवळी, समाधान वायाळ सर,
यासह गावकरी मंडळी व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती कार्यक्रमाचा समारोप भगवती जगदंबे ची आरती करून शेवटी सर्वांच्या आभार मा नेते नाना पाटील पंडित सर यांनी सर्व वारकरी भाविक भक्तांनी भोजन प्रसादी घ्यावी असे सुचित करून पसायदानाने सर्वानुमते कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Comment