🙏मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली प्रवाशांची सोय:
आपले चिखली शहर हे पुणे–नागपूर महामार्गावर असून, चिखली येथे मोठ्या संख्येने व्यापारी, उद्योजक तसेच परिसरातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.
चिखली आगाराला नवीन बसेस मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.
✅ त्यानुसार चिखली आगाराला 5 नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत.
🎉 आज या नवीन बसेसचे उत्साहात स्वागत व लोकार्पण करण्यात आले.
🛣️🚌 यानिमित्त महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या नव्या लालपरीत बसून आमदार महाले व भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत प्रवासाचा निखळ आनंदही घेतला








