Share:

घनसावंगी मतदार संघातील मौजे हातडी ता.घनसावंगी येथील कु.शिवानी रामदास शिंदे ही आळंदी देवाची येथे राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेत आहे.आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात पाऊस चालू असताना अंगात रेनकोट घालून शिवानीने रडू नको ‘बाळा,मी पाण्याला जाते,पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते’ ही गवळण सुमधुर आवाजात गायली. तिच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.आजी आजोबा पासून परमार्थाचा वारसा लाभलेला असून वारकरी संप्रदायाचा वारसा कायम जपणार असल्याचे शिवानीने सांगितले.

#संत_ज्ञानेश्वर_महाराज #पालखी #सोहळा #वारी२०२५ #vari2025

Leave a Comment