📍दुधा-ब्रह्मपुरी ता.मेहकर
रविवार दि.२८ सप्टेंबर २०२५
उबाठाच्या ९८ पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. केंद्र व राज्य सरकार मध्ये आपले सत्ता आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेला मतदान करून आपली सत्ता आणणे आवश्यक आहे.
कळंबेश्वर, देऊळगाव माळी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे चार गण विभागाचा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा दुधा ब्रह्मपुरी येथे आज आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात शिवसेना उबाठाच्या ९८ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे आयोजक किसनराव पाटील, सुदर्शन मगर, विलास मोहरूत , विठ्ठल भाकडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर,दिलीप बाप्पू देशमुख,सभापती माधवराव जाधव,महिला आघाडीच्या मायाताई मस्के यांच्या सह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र मेहकर तालुक्याचे आहे. खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी सांगितले की मी पाटबंधारे राज्यमंत्री असताना मेहकर लोणार तालुक्यात अनेक सिंचन प्रकल्प आणि तलावांची निर्मिती केली. त्यामुळे अनेक गावे टँकर मुक्त झाली. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रचंड संघर्ष केला, त्यायोगे यश मिळत गेले. नव्या पिढीला हा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षात संजय रायमुलकर व व माझ्या माध्यमातून साडेचार हजार कोटींची विकास कामे दोन्ही तालुक्यात झाली. सत्तेमुळे विकास होतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे केंद्र व राज्यात आपली सत्ता असल्यामुळे परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यमान आमदाराने निवडून आल्यापासून एकतरी विकास काम मेहकर मतदार संघात मंजूर करून आणले काय, असा प्रश्नही उपस्थित केला.
मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य गंगुबाई किसनराव पाटील, व लताबाई विष्णुपंत मगर, किसनराव अवचार, पुंजाजी बोराडे, पंजाब ढोणे, बाळू काळे, अश्विन लहाने, अमोल म्हस्के उपस्थित होते व गजानन मोरे,भागवत देवकर,विलास भाकडे, दत्ता निकम,नितीन बोऱ्हाडे, शिवाजी बोऱ्हाडे, हरी ढोले , गजानन चांगडे, रमेश वाघमारे, विनोद अंभोरे, किसन बनसोडे, गोपाल चांगाडे, रमेश वाघमारे, विनोद अंभोरे , विठ्ठल शिनगारे , प्रल्हाद अंभोरे , प्रताप लंबे ,विष्णू पदमने, रामदास गायकवाड यांच्यासह उबाठा पक्षाच्या ९८ आदी जणांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.







