Home » Uncategorized » Agriculture News : कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर

Agriculture News : कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर

Share:

खरेदी खत म्हणजे काय?

खरेदी खतात व्यवहाराची तारीख, खरेदीदार-विक्रेत्यांची माहिती, एकूण व्यवहाराची रक्कम आणि किती क्षेत्रफळावर व्यवहार झाला आहे, याची सविस्तर माहिती असते. रजिस्ट्री पूर्ण झाल्यावरच त्या मालमत्तेचा फेरफार होतो आणि सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.

खरेदी खत करण्याची प्रक्रिया कशी असते?

सरकारी मूल्यांकन (Government Valuation) आणि बाजारभाव (Market Value) समजून घ्या.दोघांच्या सहमतीने व्यवहाराची रक्कम ठरवावी. त्यानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारली जाते. व्यवहाराचे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले जातात.

उदाहरण:

जर एखाद्या फ्लॅटचा सरकारी दर 20 लाख रु आणि बाजारभाव 30 लाख रु असेल, तर व्यवहार 20 रु लाख किंवा 30 लाखांवर करण्याचा निर्णय दोघांच्या सहमतीने घेतला जातो.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

7/12 आणि फेरफार उतारे

विक्रेता व खरेदीदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीची पावती

दोन साक्षीदारांचे फोटो आणि आधार कार्ड

NA ऑर्डरची प्रत (शहरी भागात लागू)

रजिस्ट्री रद्द करता येते का?

एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर, तलाठी फेरफाराच्या नोंदीसाठी नोटीस जारी करतो. ही नोटीस 15 दिवसांपर्यंत हरकतींसाठी उघडी असते. या कालावधीत कोणतीही हरकत नोंदवली गेली नाही तर नवीन मालकाची नोंद सातबारा उताऱ्यावर होते. मात्र या प्रक्रियेदरम्यान हरकत नोंदवली गेल्यास, ती कायदेशीर पद्धतीने निकाली काढावी लागते.

मराठी बातम्या/कृषी/

कोणत्या परिस्थितीत जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर

Source link

Leave a Comment