Home » Uncategorized » Agriculture News : शेतकऱ्यांनो! सूक्ष्म सिंचन योजनेच्या अर्जप्रक्रियेला सूरवात, किती अनुदान मिळणार? वाचा सविस्तर

Agriculture News : शेतकऱ्यांनो! सूक्ष्म सिंचन योजनेच्या अर्जप्रक्रियेला सूरवात, किती अनुदान मिळणार? वाचा सविस्तर

Share:

Last Updated:

Micro Irrigation : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या कार्यक्षमतेत वाढ करून उत्पादन वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेत अनेक नवे बदल केले आहेत. “Per Drop More Crop” या संकल्पनेवर आधारित ही योजना आता अधिक पारदर्शक व तंत्रज्ञान-सुसज्ज बनली आहे.

agriculture newsagriculture news
agriculture news

मुंबई : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या कार्यक्षमतेत वाढ करून उत्पादन वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेत अनेक नवे बदल केले आहेत. “Per Drop More Crop” या संकल्पनेवर आधारित ही योजना आता अधिक पारदर्शक व तंत्रज्ञान-सुसज्ज बनली आहे. योजनेचा मुख्य उद्देश पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त उपयोग करून पीक उत्पादनात वाढ करणे हा आहे. ही योजना सध्या राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे.

योजनेचा उद्देश काय?

प्रत्येक थेंबातून जास्त उत्पादन घेणे.सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे. तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान तर इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान मिळणार आहे. यासाठीची क्षेत्रमर्यादा जास्तीत जास्त 5 हेक्टर आहे. या सूक्ष्म सिंचन संचाचा कालावधी 7 वर्षे इतका आहे. 7 वर्षांनंतर शेतकरी पुन्हा लाभ घेऊ शकतो. चल तुषार संच घेतल्यास 3 वर्षांनंतर त्याच क्षेत्रावर ठिबक संच मिळू शकतो.

लाभार्थी पात्रता काय आहे?

शेतकऱ्यांच्या नावावर मालकी हक्काचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक. शेतकऱ्याकडे सिंचनासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक.

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्यात आला आहे. 7/12 व 8-अ ही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही.कृषी विभागाच्या Mahadbt पोर्टल आणि AgriStack प्रणालीत थेट API लिंक करण्यात आली आहे. 21 मे 2025 पासून FCFS (First Come First Serve) तत्वावर लाभ दिला जात आहे.

अर्ज शुल्क किती?

अर्ज सादर करताना 20 + 3.60 (GST) = 23.60/- शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. सध्या 65,515 शेतकऱ्यांची निवड FCFS तत्त्वावर करण्यात आली आहे.

नवीन पद्धतीमुळे काय फायदे होणार?

कागदपत्रे कमी,प्रक्रिया सुलभ होणार आहे.

पारदर्शकता आणि प्रत्येक अर्जदाराची ट्रॅकिंग सुविधा असेल.

जलसंपत्तीचा शाश्वत वापर केला जाईल.

उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल.

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांनो! सूक्ष्म सिंचन योजनेच्या अर्जप्रक्रियेला सूरवात, किती अनुदान मिळणार?

Source link

Leave a Comment