Home » Uncategorized » आमचेही काही लोक माझ्यावर टीका टिप्पणी करतात, त्यांनी लक्षात घ्यावं…. भास्कर जाधव यांनी ऐकवले

आमचेही काही लोक माझ्यावर टीका टिप्पणी करतात, त्यांनी लक्षात घ्यावं…. भास्कर जाधव यांनी ऐकवले

Share:

Last Updated:

Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आजवरच्या राजकीय कारकीर्दीचे सिंहावलोकन केले. शरद पवार यांनी दिलेली संधी, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दुसऱ्यांदा केलेला प्रवेश, मंत्रि‍पदाची हुकलेली संधी, दृष्टीक्षेपात असलेले विरोधी पक्षनेतेपद आदी विषयांवर त्यांनी मन मोकळे केले.

भास्कर जाधव (शिवसेना नेते)भास्कर जाधव (शिवसेना नेते)
भास्कर जाधव (शिवसेना नेते)

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ भास्कर जाधव यांच्या पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चा रंगत आहेत. शरद पवार यांना सोडणे ही माझ्या राजकीय आयुष्यातील फार मोठी चूक होती, असे ते म्हणाल्याने शिवसेना पक्षात ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु उद्धव ठाकरे यांनी मला कधीही एकटे पडू दिले नाही. त्यांना भेटायला जायला मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही अंतर नाही, असे स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिले. त्याचवेळी पक्षातील टीका टिप्पणीलाही भास्कर जाधव यांनी थेटपणे उत्तर दिले.

भास्कर जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आजवरच्या राजकीय कारकीर्दीचे सिंहावलोकन केले. शरद पवार यांनी दिलेली संधी, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दुसऱ्यांदा केलेला प्रवेश, मंत्रि‍पदाची हुकलेली संधी, दृष्टीक्षेपात असलेले विरोधी पक्षनेतेपद आदी विषयांवर त्यांनी मन मोकळे केले. या मुलाखतीत त्यांनी नेहमीप्रमाणे रोखठोकपणे मते मांडल्याने त्यांच्या विधानांवरून ते नाराज असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी भास्कर जाधव नाराज नाहीत, असे सांगतानाच त्यांना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषणाची संधी दिल्याचे सांगितले. राऊत यांचे हेच वाक्य भास्कर जाधव यांना जाम खटकले. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाराजीच्या चर्चांवर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले.

आमचेही काही लोक माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायेत…

राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा मी व्यक्त केली, ते माझे वैयक्तिक मत आहे. त्याच पक्षांतर्गत नाराजीचा विषय अजिबात येत नाही. मी आतापर्यंत कधीही बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेला वाईट बोललेलो नाही. आतापर्यंतच्या कारकीर्दीत माझे कोणतेही वक्तव्य पक्षाच्या विरोधात नाही. जर असेल तर मी राजकीय संन्यास घेईल, असे भास्कर जाधव म्हणाले. पक्षाविरोधात आणि पक्षनेतृत्वाविरोधात एकही शब्द चुकीचा काढलेला नाही, हा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवलाय. आमचेही काही लोक माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायेत, त्यांनीही हे विचारात घेतले पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या राजकारण्यांसमोर आदर्श ठेवला आहे, असे भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांना ऐकवले.

कालच्या कार्यक्रमात माझी नाराजी तुम्हाला दिसली का?

माझ्या नाराजीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत. मी असा माणूस नाही की नाराज असलो की आड पडद्याने बोलायचे. असले काम मला जमत नाही. मी परवाच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट बोललो आहे, काल मी माझ्या मतदारसंघात शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. उद्याची पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भाने त्यांच्याशी बोललो. या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले पाहिजे, हे ध्येय मी ठेवले आहे. कालच्या कार्यक्रमात माझी नाराजी तुम्हाला दिसली का? मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याचा मी खुलासा करत नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

माझ्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणतेही अंतर नाही

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. कधीही मला गेटवर एक सेकंद थांबवले जात नाही. त्यांनी मला भेटायला बोलवावे आणि मग मी जावे, असे आमच्यातले नाते नाही. माझ्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणतेही अंतर नाही, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.

Source link

Leave a Comment