Home » Uncategorized » बुलढाणा » केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

Share:

📍 मौजे जानेफळ,मुंदेफळ ता.मेहकर

रविवार दि.२९ जून२०२५

मेहकर मतदारसंघातील मौजे जानेफळ, मुंदेफळ येथे अतिवृष्टीमुळे प्रंचड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे नुकसान झाले त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी नव्हे तर भरीव मदत मिळून देणार.

अतिवृष्टीमुळे संकटामुळे नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकरी बांधव यांच्या शी संवाद साधला.

नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी,यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे.

यावेळी मा.आ.संजयजी रायमुलकर,शिवसेना ता.प्रमुख श्री.सुरेश वाळुकर,महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी,श्री.दिलीपराव देशमुख,गटविकास अधिकारी श्री.अरुण खरात,नायब तहसीलदार अजय पिंपरकर,नितीन बोरकर,तालुका कृषी अधिकारी किशोर काळे,सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे,मोहन धोटे,रामेश्वर भिसे,राजु काटे,महसूल विभागाचे अधिकारी वर्ग,शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

Leave a Comment