Home » Uncategorized » बुलढाणा » *महाराष्ट्र काँग्रेसला अच्छे दिन येण्याअगोदर पक्षातील मोठमोठे नेते काँग्रेसच्या नेत्यांच्या त्रासाला कंटाळून करत आहेत दुसऱ्या पक्षात प्रवेश*

*महाराष्ट्र काँग्रेसला अच्छे दिन येण्याअगोदर पक्षातील मोठमोठे नेते काँग्रेसच्या नेत्यांच्या त्रासाला कंटाळून करत आहेत दुसऱ्या पक्षात प्रवेश*

Share:

राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील अत्यंत जवळचे नेते, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार कुणाल पाटील (धुळे) हे आज भाजपमध्ये सामील झाले.

कुणाल पाटील यांच्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या. कुणाल पाटील स्वतः दोनदा आमदार राहिले आहेत. आज ते भाजपमध्ये सामील झाले.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणे जसे खूप सोपे आहे, तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणे देखील खूप सोपे आहे.

काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्र भाजपचे खासदार नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पुढे नाना पटोले यांनी विधानसभा सभापतीचा अचानक राजीनामा देऊन कसं मविआ सरकार पाडायला मदत केली, हे जाहिरच आहे.

या दोन्ही पक्षांमध्ये देवाणघेवाण अगदी सहजपणे होते.

दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या हक्कांचा प्रश्न येतो तेव्हा हे दोन्ही पक्ष मौन बाळगतात आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्या पक्षांना बदनाम करतात.

भाजप म्हणजे सापनाथ, काँग्रेस म्हणजे नागनाथ

*असे कुणाल पाटील बोलले*

Leave a Comment