
अनुराधा परिवाराचे जनक, चिखली शहरात शैक्षणिक गंगा आणणारे कर्मयोगी सिद्धविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांच्या १२ फूट उंच पूर्णाकृती ब्रॅांझ पुतळ्याचे कार्य सध्या कात्रज, पुणे येथील सुप्रसिद्ध परदेशी आर्ट स्टुडिओ येथे प्रगतीपथावर आहे.
आज सौ. वृषाली बोंद्रे, PRMSS चे कोषाध्यक्ष सिद्धुभाऊ वानेरे, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नन्हई यांच्या समवेत स्टुडिओला भेट देत, सुरू असलेल्या पुतळ्याच्या प्रार्थमिक कामाची पाहणी केली. आणखी अनेक बदल चेहऱ्यामध्ये होत हा पूर्णाकृती पुतळा कलाकारांच्या मुशीतून अत्यंत अप्रतिम असा साकारणार आहे.
तात्यासाहेब बोंद्रे यांनी केवळ शिक्षणच नव्हे तर अध्यात्मिक, सहकार, सामाजिक, ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि वंचितांसाठी शिक्षण सुलभ करणे या कार्याला आयुष्यभर वाहून घेतले.
– ग्रामीण भागात इंजिनीअरिंग, फार्मसी, नर्सिंग व पॉलिटेक्निक सारखे आधुनिक शिक्षणाचे दालन निर्माण केले.
– त्यांनी उभारलेल्या शिक्षणसंस्था ह्या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी आशेचे दीपस्तंभ ठरले आहेत.
लवकरच हे तेजस्वी स्मारक अनुराधा शैक्षणिक संकुल परिसरात उभारले जाईल, जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.
🌿 तात्यासाहेबांचा पुतळा म्हणजे केवळ एक स्मृतीचिन्ह नव्हे, तर ‘ अध्यात्म, सेवा, शिक्षण आणि समाजबांधणी’ या मूल्यांचा अमर संदेश आहे.








