
*आली तुझ्या दारी*
*भक्तांची हि वारी*
*दर्शन दे आता*
*आम्हा लवकरी….||*
*वारकरी आम्ही*
*नसे आस दुसरी*
*माहेर हे अमुचे*
*हि अमुची पंढरी…||*
आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रारातील वारकरी विठुरायाच्या पंढरीकडे धाव घेतो. मात्र जिजामाता विद्यालय व विद्यालयातील विदयार्थी गावातच विठ्ठल नामस्मरणामध्ये विलीन झालेला असतो. संपूर्ण हिवरा खुर्द आज विठ्ठल नामाने निनादून गेले. विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी *विठ्ठल-रुक्मीणी, संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज , संत सोपान महाराज,संत मुक्ताबाई आणि संत तुकाराम महाराज* यांची वेशभूषा करुन दिंडी सोहळ्यामधे सहभागी झाले होते. वारकऱ्यांच्या वेषभूशेत विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर विविध अभंगावर आकर्षक पाऊली खेळून भक्तीमय वातावरण निर्माण केले. तर विद्यार्थीनींनी फुगडी या पारपांरिक भक्ती नृत्याची साथ देऊन या सोहळ्यात उत्साहाचा रंग भरला…*विद्यालयाचे मुख्याध्यापक आ.श्री संजय जारे सर यांचे हस्ते पालखीचे पूजन केले* व पालखीच्या ग्रामफेरीला सुरवात झाली.पालखी सोहळ्याच्या या कार्यक्रमाला हिवरा खुर्द येथील ह भ प श्री ज्ञानेश्वर वाढेकर व त्यांच्या भजनी मंडळाने अध्यात्म- संगीताची साथ देऊन या पालखी सोहळ्यात आणखी भर घातली. ग्राम फेरी दरम्यान अनेक भाविक पुरुष- स्त्रीयांनी, पालखीचे व वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन करुन विठ्ठलाप्रती असलेला भक्तीभाव व्यक्त केला.*जिजामाता विद्यालयाचे संस्थाध्यक्ष आ श्री माधवराव आरसोडे व संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ.वनिताताई माधवराव आरसोडे* यांनीही वेशभूषाधारी विद्यार्थ्यांचे व पालखीचे पूजन केले. गावकर्यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल मु.अ.श्री संजय जारे सरांचे व सर्व जिजामाता परिवाराचे अभिनंदन केले.*”ही एकादशी भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धी यांचे प्रतीक आहे.पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची एक महान परंपरा आहे”.* वारकरी संप्रदायातील शिस्त व संस्काराची ही अनुभूती विद्यार्थांना समृद्ध करुन गेली.पालखीच्या ग्रामफेरी नंतर विद्यालयाच्या प्रांगणावर सर्व *भजनी मंडळींचा श्री जारे सर यांचे हस्ते रुमाल व टोपी देऊन सन्मान करण्यात आला*.विद्यालयाच्या वतीने केळी व सहा शिक्षिका सौ वैशाली संजय जारे यांच्या वतीने फराळ हे सर्व सहभागी विद्यार्थी,भजनी मंडळी,उपस्थित सर्व पालकांना वितरण करण्यात आले.विठ्ठल नामाच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजामाता परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.








