📍भूमिपुत्र शेतकरी भवन,मेहकर जि.बुलढाणा
शुक्रवार दि.१८ जुलै २०२५
आज मेहकर शहरातील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे मेहकर, सिंदखेडराजा व चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या आजी-माजी पदाधिकारी यांची केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.मेहकर,सिंदखेडराजा व चिखली विधानसभा मतदारसंघांसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली.पक्षसंघटना,पक्षशिस्त,पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर भर देत, आगामी काळातील उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिवसेनेचे संघटनात्मक शक्ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी करण्याची सूचना केली त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.प्रसंगी बोलताना “शिवसेना ही जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेची ओळख कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर अवलंबून आहे.बैठकीत सर्व उपस्थितांनी मुक्तपणे आपले विचार मांडले आणि संघटनात्मक बळकटीसाठी आवश्यक सूचना मांडल्या.यावेळी माननीय खासदार व केंद्रीय मंत्री श्री प्रतापरावजी जाधव मा.आ.संजयजी रायमुलकर,मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी,ओमसिंग राजपूत,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख श्री.ऋषीभाऊ जाधव,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.मायाताई म्हस्के,सौ.जिजाताई राठोड शिवसेना- युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
.








