लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं जीवन उघडंनागडं होतं – बैल नव्हते, तरीही पत्नीसमवेत स्वतःच्या खांद्यावर नांगर घेत ते शेत नांगरत होते. हा हृदयद्रावक क्षण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला… आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले.
या दृश्यावर अनेकांनी सहानुभूती व्यक्त केली; पण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजय गायकवाड यांनी केवळ सहानुभूती न दाखवता थेट कृतीतून आपली माणुसकी जपली…!
संजुभाऊंनी अंबादास काकांशी थेट फोनवर संवाद साधत त्यांच्या हालअपेष्टा समजून घेतल्या आणि त्वरित निर्णय घेतला –
“शनिवार, ०५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता हाडोळती गावात पोहोचून त्यांना स्वतः बैलजोडी भेट देणार आहे,” असं त्यांनी सांगितलं. यासोबतच, शेतीसाठी लागणारे इतर साहित्य आणि गरजा याही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.
“मी सुद्धा अशा प्रसंगातून गेलोय. बैलाच्या मरण्यानंतर मी देखील स्वतः खांद्यावर जोत घेऊन शेती केलीय. म्हणूनच अंबादास काकांचं दुःख मला खूप जवळचं वाटतं…” असे शब्द धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी सांगून लोकांच्या काळजाला हात घातला…!
राजकीय नेत्यांमध्ये जबाबदारीची भावना कधी कधी हरवते. पण या घटनेने सिद्ध केलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे, आणि ती संजुभाऊसारख्या लोकप्रतिनिधींमध्ये झळकते.
🟠 “माणुसकीला राजकारणापेक्षा मोठं स्थान… आणि एका आमदाराच्या संवेदनशीलतेने उजळलं एक शेतकऱ्याचं आयुष्य!”
🟢 लोकसेवेचा खरा अर्थ – शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंद आणणं!








