📍 ग्रामीण रूग्णालय,मेहकर
दिनांक :-०९ जुलै २०२५
-स्टेट बँक फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनम सुरक्षा अभियाना अंतर्गत मेहकर,लोणार तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत व्यापक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून रोग निदान आणि उपचार करण्याची व्यवस्था होणार आहे. याचा जनतेने लाभ घ्यावा मा.आ.संजयजी रायमुलकर यांची आरोग्य तपासणी करून मोहिमेचा आरंभ करण्यात आला.
-भाषणात मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे . त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जीवनम सुरक्षा तपासणी मोहिमे अंतर्गत पहिल्या टप्प्यात मेहकर, लोणार तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष तपासणी मोफत करण्यात येणार आहे. यात रोगांचे निदान करणे शक्य होणार असून शासकीय योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या उपचाराची ही सोय करण्यात येणार आहे. शिवसेना आणि रुग्णसेवा हे पूर्वीपासून अतूट नाते आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या त्या गावांमध्ये संपूर्ण नागरिकांची या मोहिमेत तपासणी करून घ्यावी. ग्रामीण भागासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी ०३ कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करून देता आले व या मोफत व्यापक आरोग्य तपासणी मोहिमेचा ग्रामीण भागातील जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्याा असे यावेळी मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब यांनी सांगितले.
यावेळी
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर,माजी सभापती दिलीप बापू देशमुख,युवासेनेचे तालुकाप्रमुख भूषण घोडे,ॲड.विनोद नरवाडे,नगरसेवक रविराज रहाटे,नगरसेवक मनोज जाधव, नगरसेवक विकास जोशी,राजेश काटे,वैभव सावजी, वैद्यकीय अधिकारी डॉ.फिवसे मॅडम,स्टेट बँक फाऊंडेशनचे डॉ.दत्ता साखरे,डॉ.स्वप्नील चव्हाण,डॉ. निखिल घोडे,डॉ.आशिष वनारे,डॉ.धैर्यशील रहाटे,डॉ.शैलेश पळसकर,डॉ.प्रियंका राठोड,डॉ.अजगर,डॉ.योगिता जयस्वाल,संदीप पागोरे,शंकर वायाळ, धनंजय जाधव,दिपक लहाने, समाधान काळे,राजू डोंगरे व स्थानिक शिवसेना युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








