Home » Uncategorized » बुलढाणा » स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज..!!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज..!!

Share:

बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत रणनीतीची आखणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सज्ज झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. हर्षवर्धन दादा सपकाळ आणि राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आज सोमवार दि. २१ जुलै २०२५ ला, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व आजी व माजी ब्लॉक अध्यक्षांची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व आजी माजी ब्लॉक चे अनुभवी पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांची दिशा आणि प्रचाराचे नियोजन अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळावे यासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार केला.

बैठकीदरम्यान, अनेकांनी असे मत व्यक्त केले की जनतेचा कल पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे. विकास, स्थिरता आणि लोकाभिमुख धोरणांमुळे काँग्रेसवर जनतेचा विश्वास वाढतो आहे.

पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा एकदा भक्कमपणे उभारी घेईल, असा ठाम विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment