Home » Uncategorized » बुलढाणा » अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा – शेतकऱ्यांना धीर, सरसकट मदतीचे आश्वासन..!

अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा – शेतकऱ्यांना धीर, सरसकट मदतीचे आश्वासन..!

Share:

 

आज बुलढाणा व मोताळा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्यासह मी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. अतिवृष्टीमुळे शेतशिवार पाण्याखाली गेले असून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. ग्राम पाडळी, गिरडा, चौथा (बुलढाणा तालुका) तसेच नळकुंड, उबाळखेड, राहेरा, गूळभेली, खामखेड (मोताळा तालुका) या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.

या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब म्हणाले – “महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीची योग्य दखल घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट मदत मिळावी यासाठी शासनदरबारी ठोस पावले उचलली जातील.” तर मी सांगितले की – “शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा आम्हाला समजतात. पंचनामे त्वरीत करून जास्तीत-जास्त मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठी आम्ही सातत्याने शासन व प्रशासनाशी पाठपुरावा करू.”

पाहणीदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. नुकसानभरपाई वेळेत व न्याय्य पद्धतीने मिळावी यासाठी काटेकोर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

या पाहणी दौऱ्यात शिवसेना आमदार संजयजी गायकवाड ग साहेब, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, नेत्या अनुजाताई सावळे, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, नेते शरदचंद्र पाटील, गणेशसिंग राजपूत, युवासेना तालुकाप्रमुख मारुती कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, ज्येष्ठ पत्रकार विश्वासराव पाटील, मोताळा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह प्रशासनातील उपविभागीय अधिकारी बुलढाणा श्री. शरद पाटील, उपविभागीय अधिकारी मलकापूर श्री. शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. ढगे, तहसीलदार बुलढाणा श्री. विठ्ठल कुमरे, तहसीलदार मोताळा श्री. जंगम, गटविकास अधिकारी बुलढाणा श्री. तायडे, मोताळा बीडिओ श्री. भारसाकळे, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासन, प्रशासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

 

Leave a Comment