आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आलीय.
या बैठकीत आमदार संजयजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमावेत निवडणुकीसंदर्भातील व्यापक नियोजन, संघटनबांधणी आणि जनसंपर्क विषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक सक्षम आणि व्यापक जनसंपर्कासह उतरेल, असा आत्मविश्वास या बैठकीतून निर्माण झाला.
या वेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, गणेशसिंग राजपूत, संजय हाडे, अनुजाताई सरकटे, वैशालीताई ठाकरे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना प्रमुख श्रीकांत गायकवाड, रामेश्वरीताई चव्हाण, प्रमिलाताई गवई व अन्य पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








